कोरेगाव भिमा : प्रतिनिधी
दीपावलीच्या दिप्यमान सणात दुर्ग, किल्ले बनविणे ही आपली परंपरा असून मुलांच्या कलागुणांना या मधून वाव मिळतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मुलांना समजेल असे उद्गार आदर्श सरपंच संदीप ढेरंगे यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथे दीपावली निमित्ताने संदीपदादा ढेरंगे फाउंडेशन च्या माध्यमातून मागील वर्षी पासून कोरेगाव भिमा येथे किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी स्पर्धेत कोरेगाव भिमा येथील तब्बल ३० स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र, चषक देण्यात आले. तर विजेत्या स्पर्धकांना चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम भेट देण्यात आली.

यावेळी आदर्श सरपंच संदीप ढेरंगे, माजी ग्रामपंचायत सदस्या अंजली ढेरंगे, पै. गणेश काशिद, सुदाम तापकीर, सोपान गव्हाणे, आबासाहेब कांचन, परीक्षक आदी मान्यवर आणि स्पर्धक उपस्थित होते.
किल्ले बनवा स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे :-
मोठा गट
प्रथम क्रमांक अखिल फडतरे वस्ती
द्वितीय क्रमांक : रॉयल युवाशक्ती ग्रुप
तृतीय क्रमांक : श्लोक सचिन लोहार
तर उत्तेजनार्थ कुणाल रमेश काटे व नम्रता उमेश पवार
छोटा गट
प्रथम क्रमांक : हर्ष काळूराम घावटे, राधा सचिन घावटे, युवा साळुंके (संयुक्त)
द्वितीय क्रमांक : रुद्र भोकरे
तृतीय क्रमांक : दूर्वा गणेश गव्हाणे
या स्पर्धेसाठी किल्ल्यांचे परीक्षण गोरक्ष घावटे, म्हस्कु शिवले, नारायण गव्हाणे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली ढेरंगे यांनी तर आभार आदर्श सरपंच संदीप ढेरंगे यांनी मानले.





