गजानन गव्हाणे पाटील
मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोरेगाव भीमाती पिंपळे जगताप रोडच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीचा (खड्डे भरण्यास) खर्च माजी उपसरपंच नितीन गव्हाणे पाटील यांनी स्वखर्चाने केल्याने अनेकांच्या उंचावल्या असून सर्व स्तरातून नितीन गव्हाणे यांचे अभिनंदन होत आहे.
मागील अनेक दिवस कोरेगाव भिमा ते पिंपळे जगताप रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती. या मधे कोरेगाव भिमा चे बाजूने शंभू नगरी चे बाजूच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले होते. तशा अवस्थेत या भागातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, कामगार वर्ग तसेच शेतकरी बांधवांना ये जा करावी लागत होती. ऐन पावसाळ्यात या रस्त्यावर ठीक ठिकाणी पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता.

एकीकडे दिवाळी निमित्ताने नेते मंडळी एकमेकांना शुभेच्छा देत असताना माजी उपसरपंच नितीन गव्हाणे यांनी स्व खर्चाने या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली. या मुळे किमान काही प्रमाणात का होईना नागरिकांनी समाधान व्यक्त केले.





