गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा – सणसवाडी पंचायत समितीच्या गणात या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने कोरेगाव भिमा ग्रामपंचायत च्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या मनिषा संपतराव गव्हाणे या निवडणुकीच्या आखाड्यात पूर्ण ताकतीने उतरण्याच्या तयारीत असून केलेल्या विकास कामांच्या आणि संपर्काच्या जोरावर जनता मला स्वीकारेल असा विश्वास मनिषा गव्हाणे यांनी आपली लोकशाही न्यूज ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.

मनिषा गव्हाणे यांनी कोरेगाव भीमा – सणसवाडी – वाडा पुनर्वसन या पंचायत समितीच्या गणात आपला संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. तसेच दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रत्येक मतदाराला प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

मनिषा गव्हाणे यांचा कोरेगाव भिमा येथील धार्मिक कार्यामध्ये सहभाग मोठा असून सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, खंडोबा मंदिर यांच्या जिर्णोधारामध्ये सहभाग आहे . त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना कोरेगाव भिमा जिल्हा परिषद केंद्र शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीमध्ये ग्रामपंचायत चे प्रतिनिधित्व त्यांनी केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढीसाठी तसेच विद्यालयात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रयत्न केले आहे.

स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच कुटुंबातील इतरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयास क्रीडा साहित्य, शालेय पुस्तकांचे वाटप त्याचप्रमाणे वाढदिवसाचे निमित्ताने झाडे लावण्यात आली. तसेच यावर्षी नुकतीच कस्तुरी मुसमाडे या मुलीची नासासाठी निवड झाल्यामुळे तिचा सत्कार करून तिचा बारावीपर्यंतचा शिक्षणाकरता लागणारे सगळे शैक्षणिक साहित्य देण्याचा संकल्प केलेला आहे.

ग्रामपंचायत चे माध्यमातून कोरेगाव भिमा प्रभाग क्रमांक ५ मधील रस्ते, पिंपळे जगताप रोड, शिवशक्ती नगर, बालाजी नगर मधील बंदिस्त गटार योजना, प्रभागातील स्ट्रीट लाईट, हायमस्ट पोल, बालाजीनगर मधील नादुरुस्त विद्युत रोहित्र , एअर बंच केबल तसेच इतर अनेक लहान मोठ्या कामाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न केले.

एकीकडे घरात राजकारणाची जोड असल्याने गव्हाणे पाटील कुटुंब शैक्षणिक, राजकीय, सामाजिक तसेच इतर कार्यात नेहमीच अग्रेसर असते. यामध्ये मनिषा संपतराव गव्हाणे पाटील यांचे सासरे गंगाराम गेणुजी गव्हाणे हे १९५२ ते १९६२ सलग दोन पंचवार्षिक कोरेगाव भिमा चे सरपंच पद भूषविले. त्यांचे दीर देविदास गव्हाणे यांनी विविध कार्यकारी विकास सोसायटी क्रमांक २ चे चेअरमन पद भूषविले. तर संपत गव्हाणे हे मागील ३५ ते ४० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत.
यामुळे मनिषा गव्हाणे या निवडणुकीचे रिंगणार पक्ष श्रेष्ठींनी संधी दिल्यास पंचायत समिती निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.





