गजानन गव्हाणे पाटील
दीपावली सण साजरा करत असताना आपली परंपरा जपा तसेच फटाके वाजवताना स्वतः ची व दुसऱ्यांची देखील काळजी घ्या असे आवाहन कोरेगाव भिमाचे माजी उपसरपंच आणि ज्ञानांकुर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार कांतिलाल फडतरे यांनी केले.

सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दीपावली निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा मोहिनी संजय फडतरे, सचिव ज्योती कांतिलाल फडतरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंगे – घुटे तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दीपावली सणाचे महत्व कळावे यासाठी बसुबरस – कल्याणी ढमढेरे, धनतेरस – अश्विनी उन्हाळे, लक्ष्मी पूजन – अर्चना सेलमोकर, भाऊबीज – रोहिणी शिंदे या शिक्षकांनी प्रत्येक दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. तर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी नृत्यातून सर्वांना दीपावली च्या शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमाचे अंतर्गत विद्यालयात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये रांगोळी, आकाश कंदील बनविणे, पणत्या रंगविणे आदी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निर्मला मुरकुटे यांनी केले तर आभार सागर फडतरे यांनी मानले.





