गजानन गव्हाणे पाटील
कुटुंबातील सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी कोरेगाव भिमा येथून कोमल सत्यनारायण ढेरंगे या शिरूर पंचायत समितीच्या कोरेगाव भीमा – सणसवाडी – वाडा पुनर्वसन या गणातून निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकतीनिशी उतरण्यासाठी सज्ज असून महिला वर्गामध्ये लोकप्रियतेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिरूर तालुका पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक करिता गण निहाय आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली. यात शिरूर तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला कोरेगाव भिमा – सणसवाडी – वाडेगाव पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठरला आहे. यानंतर या गणात आता राजकीय चर्चांना उधाण आले असून कोरेगाव भिमाचे युवा उद्योजक, खरेदी विक्री संघाचे संचालक सत्यनारायणबापू ढेरंगे यांच्या पत्नी कोमल सत्यनारायण ढेरंगे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. “कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही!” असा ठाम निर्धार करून कोमल ढेरंगे यांनी आपली तयारी सुरु केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून कोरेगाव भिमाचे माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, सत्यनारायण ढेरंगे आणि कोमल ढेरंगे यांनी शिरूर तालुक्यातील जनतेसोबत सातत्याने जनसंपर्क ठेवला असून, खासकरून महिलांच्या हितासाठी विविध उपक्रम आणि भव्य कार्यक्रम राबविले आहेत.

स्थानिक पातळीवर कोमल ढेरंगे यांचा महिलांमध्ये मोठा संपर्क असून महिला वर्गात त्या अधिक लोकप्रिय आहेत. सोबत घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक आधारस्तंभ विठ्ठलअप्पा ढेरंगे, त्यांचे दीर माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, पती सत्यनारायण ढेरंगे यांनी केलेल्या विकास कामांचा आणि सामाजिक उपक्रमांचा फायदा आता कोमलताईंना निवडणुकीत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

कोरेगाव भिमा – सणसवाडी – वाडेगाव पंचायत समिती गणातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि चर्चेची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.





