कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या दत्तकृपा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूकीत दत्तकृपा सहकारी पॅनेल ११/० ने दणदणीत विजय मिळविला असल्याचे माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी दिली. तर मायबाप मतदारांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू असे याप्रसंगी वारघडे यांनी स्पष्ट केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय माळवदकर यांनी काम पाहिले.
बकोरी, ता. हवेली येथील माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गोविंद वारघडे यांनी २५ वर्षापुर्वी स्थापन केलेल्या दत्तकृपा विविध कार्यकारी सहकारी संस्थेची ११ जागेसाठी निवडणूक झाली व २ जागा बिनविरोध झाल्या होत्या पैकी उर्वरीत ११ जागेची निवडणूक नुकतीच बकोरी येथे पार पडली. त्यामध्ये चंद्रकांत वारघडे यांच्या दत्तकृपा सहकारी पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.निवडणूक काळात अनेक घडामोडी घडल्या त्यामध्ये भाजपचे नेते नानासाहेब कोंडीबा अबनावे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे त्यांना निवडणूक लढवता आली नाही.
दत्तकृपा सहकारी पॅनेलच्या उमेदवारांना पडलेली मते खालील प्रमाणे :-
सर्वसाधारण मतदार संघ : चंद्रकांत गोविंद वारघडे (१२३ मते), प्रकाश दादाभाऊ कुटे (१२४ मते), रमेश काळुराम कुटे (१२४ मते), काळुराम बबन वारघडे (१२३ मते), सोपान कांतीलाल वारघडे (११८ मते), दत्तात्रय गुलाब वारघडे (११९ मते), विलास नामदेव जाधव (११४ मते), पांडुरंग जयवंत वारघडे (११९ मते)
महीला राखीव मतदारसंघ : विमल सुखदेव वारघडे (१२२ मते), शारदा तुळशीराम वारघडे (११७ मते)
भटक्या जाती,जमाती विमुक्त मागास प्रवर्ग : किसन चंदर टुले (१२१ मते)
ईतर मागासवर्ग प्रवर्ग बिनविरोध उमेदवार : बेबी शांताराम कोलते
अनुसूचित जाती जमाती मतदार संघाचे बिनविरोध उमेदवार : बापू लक्ष्मण कांबळे
बकोरी गावचे माजी सरपंच ईश्वर गाडुते यांचे श्रीनाथ परीवर्तन पॅनेलला बिनविरोध निवडून आलेल्या एकाच जागेवर समाधान मानावे लागले व चुरशीच्या झालेल्या लढतींमध्ये खुप मोठ्या फरकाने दत्तकृपा सहकारी पॅनेल चे उमेदवार निवडून आले.
निवडणुकीत माजी सरपंच गुलाबराव वारघडे, सागर वारघडे, बाळु ज्ञानेश्वर वारघडे, रामदास गुलाब वारघडे, उत्तम बापू वारघडे, कमलेश बहीरट, महेश वारघडे, राजेश वारघडे, धनराज वारघडे, सागर कुटे, सोमनाथ वारघडे, विकास जाधव, कैलास कुटे यांनी प्रयत्न केले. संस्थेच्या वतीने संस्थापक चंद्रकांत वारघडे यांनी सर्वांचे आभार मानले.
निवडणूक कामामध्ये कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लोणिकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांचे माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.







