- Advertisement -spot_img
Homeशालेयश्री छत्रपती संभाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिवाळी निमित्ताने विद्यार्थ्यांना मिठाई वाटप

श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिवाळी निमित्ताने विद्यार्थ्यांना मिठाई वाटप

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिवाळी मिठाई खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष रवींद्र फडतरे, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य बापूसाहेब शिंदे, उद्योजक राजेंद्र शिंदे हे उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य, पुणे विभाग प्रमुख तसेच अजिवसेवक तसेच विद्या समिती सचिव अनिल साकोरे यांनी सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
ईश्वर, अध्यात्म आणि धार्मिक परंपरा यांची जपणूक म्हणजेच सण भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आणि देशाची विविधता या सणांच्या मार्फत दर्शविली जाते. कुटुंब व समाज एकत्र आणण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणजेच सण. कार्तिक महिन्यातील दिवाळी या सणाविषयी प्राचार्य अनिल साकोरे यांनी माहिती दिली. तसेच केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे काही पालक आणि विद्यार्थी दिवाळी सण साजरा करू शकत नाहीत त्यामुळे शाळेतील अनेक उपक्रमा अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला अशी माहिती प्रास्ताविकातून प्राचार्य अनिल साकोरे यांनी दिली.


याप्रसंगी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष रविंद्र फडतरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून दिवाळीच्या सदिच्छा व शुभेच्छा सर्वांना दिल्या. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि स्थानिक सल्लागार समिती सदस्य, शिक्षण तज्ञ सिराज भाई इनामदार यांनीही खाऊ वाटपात महत्त्वाचा सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पलता गिरी यांनी तर आभार वर्षा वाजे यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page