मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद करणार सर्वतोपरी मदत
गजानन गव्हाणे पाटील
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान छोट्या गावांच्या तुलनेत मोठी गावे योजनेत निकषात बसवणे हे अवघड काम असताना कोरेगाव भिमा सारख्या मोठ्या गावाने यात सहभाग घेत घनकचरा व्यवस्थापनात चांगले केले असुन जिल्हा परिषदेच्या धर्तीवर नाविन्यपूर्ण व सर्वसामान्यांना मार्गदर्शक ठरेल असे वेबसाईटचे व करभरणा करण्यासाठी क्यु.आर कोडचे केलेले काम कौतुकास्पद असून इतर ग्रामपंचायतींसाठी कोरेगाव भिमा येथिल काम आदर्श ठरणार आहे. कोरेगाव भिमा सारख्या गावात अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.
कोरेगाव भिमा तालुका शिरूर येथे जिल्हा परिषदेच्या वतीने नुकताच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने गाव भेट दौरा वकचरा वर्गीकरण प्रकल्प, सीसीटीव्ही, महिलांची आरोग्य तपासणी, डिजिटल शाळा, grampanchyatkoregaonbhima.org या वेबसाईट सह विविध विकास कामांचे उद्घाटन भूमिपूजन समारंभ जिल्हा परिषदेचे प्रजासत्ता मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, गटविकास अधिकारी महेश डोके, विस्ताराधिकारी आर आर राठोड, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे, पंचायत समितीचे माजी सदस्य पी के गव्हाणे, अण्णासाहेब मगर बॅंकेचे संचालक राजाराम ढेरंगे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक कैलासराव सोनवणे, सोसायटीचे माजी अध्यक्ष पंडित ढेरंगे, माजी सरपंच अमोल शहाजी गव्हाणे, शरद ढेरंगे, सदस्या वंदना गव्हाणे, रेखा ढेरंगे, जयश्री गव्हाणे, कोमल खलसे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत वाव्हळ व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी कोरेगाव भिमा ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे लोकार्पण केले. यावेळी नासा संस्थेस भेट देण्यासाठी जाणाऱ्या कस्तुरी मुसमाडे या विद्यार्थिनीशीही गजानन पाटील यांनी संवाद साधला.

तर ग्रामपंचायत कार्यालयात १०२ महिलांची ॲनिमिया तपासणी करण्यात आली असून १४८ नागरिकांनी आभा नोंदणी केली असून ७०७ नागरिकांना आयुष्यमान गोल्डन कार्ड ची वाटप करण्यात आले. यावेळी १६ महिलांचा ॲनिमिया रिपोर्ट ( एच बी ) दहाच्या खाली आढळून आला असल्याने त्यांच्या हिमोग्लोबिन वाढीसाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी उपाययोजना ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार आहे
यावेळी जिल्हा परिषदेच्या शालेय मुलींची कॅन्सर पासून मुक्तता करण्यासाठी जिल्ह्यातील ९ ते १४ वयोगटातील ३५ हजार मुलींना कॅन्सर प्रतिबंधक लस मोफत देणार असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जालिंदरनगरच्या शाळेत सिम्बॉयसिसच्या माध्यमातून उभारलेल्या सायन्स लॅब सारखी लॅब काही दिवसात कोरेगाव भिमा येतील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा या ठिकाणी उभारून मुलांना शैक्षणिक प्रगती बरोबर आधुनिक तंत्रज्ञान युक्त विद्यार्थी घडवण्यावर भर द्यावा असे आवाहन करत सायन्स लॅब उभे राहिल्यावर ते पाहण्यासाठी स्वतः येणार असल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले.
कोरेगाव भिमा ग्रामपंचायतीचे उपक्रम कौतुकास्पद
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोरेगाव भिमाचे अतिशय चांगले काम असुन ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती सह १५ हजार वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रमासह जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करताना विद्यार्थी विकास हा केंद्रबिंदू मानून शाळेची केलेली भौतिक प्रगती कौतुकास्पद असल्याने कोरेगाव भिमा आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील असे आश्वासन जिल्हा परिषदेचे प्रशासकता मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिले.

पंचायतराज अभियान यशस्वी करणार
जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्याबरोबरच गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान काळामध्ये नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार असून ग्रामस्थांना घरबसल्या सर्व शासकीय योजना, कर भरणा यासह सुविधा निर्माण करून देण्याबरोबरच गावचा सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागासह प्रशासनाच्या वतीने अभियान काळात कोरेगाव भिमा आदर्श ग्राम करण्यावर भर देणार असल्याचे सरपंच संदीप ढेरंगे व ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत वाव्हळ यांनी सांगितले.





