- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भिमा येथील गजराई नगर मधील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन

कोरेगाव भिमा येथील गजराई नगर मधील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील ढेरंगे वस्ती परिसरातील गजराई नगर मधील उर्वरित रस्त्याचे सिमेंट काँक्रिट करण्यासाठी माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, प्रकाश ढेरंगे तसेच उद्योजक नारायणबापू ढेरंगे यांनी विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे पाठपुरावा केला होता अखेर आमदार निधीच्या माध्यमातून तब्बल दहा लाख रुपये या रस्त्यासाठी मिळाल्याने या कामाचा शुभारंभ नुकताच गजराईनगर या ठिकाणी करण्यात आला.
नुकतेच या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदरचा रस्ता सिमेंट काँक्रीटिकरण होत असल्याने या भागातील नागरिकांच्या समस्या काही प्रमाणात का होईना सुटण्यास मदत झाली आहे. रस्त्याच्या दर्जेदार कामामुळे या भागातील नागरिकांना आरोग्याच्या, स्वच्छतेच्या तसेच दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने या भागाचा विकास नक्कीच होईल असे प्रतिपादन यावेळी माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे यांनी केले.


यावेळी माजी उपसरपंच नितीन गव्हाणे, जगदीश ढेरंगे, कृष्णकांत सातव, जय जिजाऊ महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा तसेच यशशक्ती महिला प्रभागसंघाच्या कोषाध्यक्षा कोमल सत्यनारायण ढेरंगे, अविनाश शिंदे जे जे कॉन्ट्रॅक्टर तसेच गजरा नगर आणि म्हसोबा नगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page