- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भीमा येथील वैभव ढेरंगे यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

कोरेगाव भीमा येथील वैभव ढेरंगे यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
ग्रामीण भागात कोणत्याही भौतिक सुविधा नसताना वैभव भाऊसाहेब ढेरंगे यांनी शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेत प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक अडचणींवर मात करत राज्यकर निरीक्षक या पदावर मिळवलेली निवड ही अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामिण भागातील तरुणांनपुढे आदर्श निर्माण झाला असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य पि.के. गव्हाणे यांनी सांगितले.


कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वैभव भाऊसाहेब ढेरंगे यांनी राज्यकर निरीक्षक या पदावर मिळवलेली निवड ही अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पंचायत समिती सदस्य पि.के. गव्हाणे, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, माजी घोडगंगा कारखान्याचे संचालक कैलासराव सोनवणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, राष्ट्रवादीचे नारायणराव फडतरे, सरपंच संदीप ढेरंगे, सोसायटीचे माजी अध्यक्ष बबनराव गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, भाऊसाहेब ढेरंगे, पोलीस उपनिरीक्षक घावटे, शंकर गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्या वंदना गव्हाणे, जयश्री गव्हाणे, रेखा ढेरंगे, कोमल खलसे आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना राजाराम ढेरंगे यांनी सांगितले कि, ग्रामीण भागातील वैभव ढेरंगे यांनी शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतला होता. मर्यादित साधनसामग्री, प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी चिकाटीने अभ्यास केला. सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी प्रतिष्ठित अशा राज्य कर निरीक्षक पदावर आपले नाव कोरले असून आम्हाला त्याचा अभिमान वाटतो असे सांगितले.


वैभवचे यश हे गावचा नावलौकिक
वैभवने लहानपणापासूनच शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले होते. घरातील परिस्थिती सोपी नव्हती, पण त्याने ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सातत्याने प्रयत्न केले. आज त्याचे स्वप्न साकार झाले असून वैभव चे यश हे गावचे नावलौकिक करणारे असल्याचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page