गजानन गव्हाणे पाटील
शिक्षक दिनाचे औचित्य साधत कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील फ्रेंड्स फाउंडेशन च्या माध्यमातून गावातील तसेच पंचक्रोशीतील विविध शाळांमधील गुरुजनांचा यथोचित सन्मान करण्यात आला असल्याची माहिती फाउंडेशन चे संस्थापक शंकर (काका) ज्ञानोबा गव्हाणे पाटील यांनी दिली.

या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोरेगाव भिमा, सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल, फ्रेंड्स स्कूल, विनर्स स्कूल, फडतरे वस्ती जिल्हा परिषद, वढू बुद्रुक जिल्हा परिषद शाळा, शरद चंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय, ढेरंगे वस्ती, फडतरे वस्ती, डिंग्रजवाडी जिल्हा परिषद, अंगणवाडी आदी विद्यालयातील गुरुजनांचा यावेळी गुलाबपुष्प आणि शुभेच्छा पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
फ्रेंड्स फाउंडेशन च्या माध्यमातून या पुढील काळात शैक्षणिक क्षेत्रात भरघोस कामे करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय, मंथन तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा यासाठी प्रत्येक शाळेत सुसज्ज ग्रंथालये फाउंडेशन, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी व्यक्तींच्या माध्यमातून उभारली जातील असे यावेळी फाउंडेशन चे संस्थापक शंकर (काका) गव्हाणे पाटील यांनी सांगितले.

यावेळी उद्योजक बन्सीशेठ वाडेकर, राजेंद्र गव्हाणे, प्रकाश खैरमोडे, शिवाजी वाघमारे, जालिंदर आरगडे, सतीश शिंदे, धनाजी शिवले, सर्जेराव भंडारे, सुरेश भंडारे, बापूसाहेब गव्हाणे, बाबुलाल गव्हाणे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.





