गजानन गव्हाणे पाटील
वढू खुर्द, ता. हवेली येथे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच अनिलभाऊ चोंधे, विद्यमान सरपंच महेंद्र खांदवे, उपसरपंच कोमल धुळे, माजी उपसरपंच सिमा भंडलकर, माजी उपसरपंच नवनाथ पवळे, प्रकाश चव्हाण, सुरेश चोंधे, सर्जेराव पवळे, विलास खांदवे, अशोक डुकरे, राघु तापकिर, स्वप्निल भोंडवे, शंकर दरेकर, प्रविण ढवळे, मधुकर भंडलकर तसेच जय मल्हार क्रांती संघटनेचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या सभेचे अध्यक्ष माजी सरपंच माऊली चोंधे होते व आभार रमेश भंडलकर यांनी मानले.





