गजानन गव्हाणे पाटील
पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला “सायकल बँक एक सामाजिक चळवळ” उपक्रमाचे अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कोरेगांव भिमा येथील गरजू विद्यार्थिनीला सुवर्णयुग युवा प्रतिष्ठान चे माध्यमातून सायकल चे वाटप करण्यात आले.
७९ व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठानचे माध्यमातून एक सामाजिक उपक्रम म्हणून गरजू मुलीला एक सायकल भेट देण्यात आली. यामुळे या मुलीला शाळेत येताना होणारी पायपीट कमी होणार आहे. त्याप्रसंगी प्रतिष्ठान चे नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर बापूसाहेब शिंदे यांचा विद्यालयाचे वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गव्हाणे व मुख्याध्यापिका उषा भंडारे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना किशोर शिंदे यांनी यापुढील काळात विद्यालयाला काही मदत लागली तर ती पूर्ण करण्यासाठी सुवर्णयुग युवा प्रतिष्ठान नेहमी पुढे राहील अशी ग्वाही दिली.
या उपक्रमाचे अंतर्गत सायकल देण्यासाठी विद्यमान अध्यक्ष किशोर बापूसाहेब शिंदे, उपाध्यक्ष अनिकेत जितेंद्र कांबळे यांचे सह माजी अध्यक्ष श्रीकृष्ण बबन घावटे, खजिनदार मयूर चंद्रकांत घावटे, कार्याध्यक्ष यश मधुकर गव्हाणे, सचिव संकेत संदीप सासवडे, प्रतिष्ठान चे सभासद अभिषेक रोहिदास पोटफोडे, साहिल सुदाम घावटे, ऋषिकेश सोपान घावटे, तन्मय संतोष शेंडकर, अवधूत संदीप घावटे, रोहन संतोष घावटे, आदित्य संतोष घावटे, वैभव संदीप घावटे, समर्थ काळूराम घावटे, प्रथमेश बबुशा घावटे, ओंकार सुनिल घावटे, शंभु सोमनाथ घावटे आदींनी सहकार्य केले.





