- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटात एक नवा आशेचा किरण

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटात एक नवा आशेचा किरण

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा – सणसवाडी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी सध्या इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी चालू असून त्यातीलच एक उमेदवार भाजपचे जयेश शिंदे आता ग्रामस्थांच्या मनातील एक आशेचा किरण समजला जात आहे.
नावासाठी नाही तर गरजवंतांसाठी नेहमी झटणारे जयेश शिंदे गोर गरिबांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी झालेले दिसून येतात. ज्या ठिकाणी बड्या नेत्यांचा वशिला कामी येत नाही त्या ठिकाणी जयेश शिंदे नेहमी उभे असतात. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे कोरेगाव भिमा येथे एका गरीब कुटुंबाचा दुचाकीवरून अपघात झाला होता. अपघातामध्ये नवरा बायको व ८ महिन्याचे लहान बाळ होते. अपघात एवढा गंभीर होता की, आसपासच्या हॉस्पिटल मध्ये त्यांना कोणीही उपचारासाठी घेतले नाही अखेर त्यांना पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटल मध्ये रवाना करण्यात आले. पीडित कुटुंब हे गरीब घरातील असल्याने उपचारासाठी आलेला पावणे दोन लाख रुपये खर्च भरणे अशक्य असल्याने पीडितांच्या नातेवाईकांनी काही बड्या नेत्यांशी संपर्क केला मात्र त्याचा काहीही फायदा न झाल्याने एक आशेचा किरण म्हणून अखेर जयेश शिंदे यांना सदर हकीकत कळवली. जयेश शिंदे यांनी सदर घटनेची दखल घेत त्वरित त्या ठिकाणी एक माणूस पाठवून त्या आलेल्या बिलातील तब्बल ४०% खर्च कमी करून देत पीडित कुटुंबास मोलाचे सहकार्य केले. अशा प्रकारे जयेश शिंदे यांनी अनेक गोरगरीब रुग्णांची करोडो रुपयांची बिले माफ करत वेळोवेळी मदत केली आहे.


गावोगावी विकास कामे पोहचविणे, विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मदत, शेतकऱ्यांच्या ट्रांसफार्मर बद्दलच्या अडचणी तत्पर दूर करण्यासाठी मदत,महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारची योजना थेट जनता पर्यंत पोहाचवणे,रक्तदान शिबिर,महाआरोग्य शिबिर, दिव्यांगांसाठी साहित्य वाटप, शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी साहित्य वाटप तसेच नागरिकांचे प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी जयेश शिंदे नेहमी तत्पर असतात म्हणूनच जयेश शिंदे यांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून पाहिले जात आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत जयेश शिंदे मोठ्या मतांनी निवडून येतील असा अंदाज देखील ग्रामस्थांमधून वर्तविला जात आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page