- Advertisement -spot_img
Homeक्राईमकोरेगाव भिमा येथील युवक बेपत्ता

कोरेगाव भिमा येथील युवक बेपत्ता

- Advertisement -spot_img

कोरेगाव भिमा : 
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथून २ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास एक युवक गावातून बेपत्ता झाला असून या बाबत शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, सनु बलराम हरिजण (वय २४ वर्षे, रा. कोरेगाव भिमा, ता. शिरूर) हा युवक २ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास कोरेगाव भिमा येथून बेपत्ता झाला आहे. याचे आजोबा यलम्मा कृष्णा हरिजन हे येथील बाजार मैदानात भाजीचे दुकान चालवतात शिनू घरी आला नसल्याने त्याचे आजोबांनी शोधाशोध करून ही तो सापडला नसल्याने याची खबर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली.


शीनू याला मराठी, हिंदी आणि तेलगू या भाषा येतात. तसेच त्याने पांढरा शर्ट आणि काळी पँट घातलेली आहे. अंगाने सडपातळ ५ फूट ४ इंच उंची असून सदर मुलगा कुठे दिसल्यास 7330043265 तसेच 9673904947 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पालकांचे वतीने करण्यात आले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page