गजानन गव्हाणे पाटील
विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुढे जायचे असेल तर प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवणे गरजेचे असल्याचे मत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी व्यक्त केले.
वढू बुद्रुक, ता. शिरूर येथील धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळाच्या शरदचंद्रजी पवार विद्यालयात आयोजित ज्ञानगंगा वार्षिक व्याख्यानमाला कार्यक्रमात विज्ञान दृष्टिकोन – – माझे ध्येय, माझे कार्य या विषयावर आयोजित व्याख्यान मालेत ते बोलत होते. यावेळी विद्यालयातील ७५० विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच संस्थेचे पदाधिकारी साहेबराव भंडारे उपस्थित होते.
डॉ. जे. के. सोळंकी पुढे म्हणाले की, भारतीय वैज्ञानिकांनी साहित्य वापरून जागतिक दर्जाचे सशोधन केंद्र पुण्यात उभारले आहे. याचे श्रेय सर्व भारतीयांचे आहे. खगोलशास्त्र आपल्या जीवनातील अविभाज्य घटक असून प्रत्येक सजीवाला जो सूर्याचा प्रकाश दिसतो त्यातील तसेच अवकाशातील विविध ग्रहांची माहिती यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच अवकाशातील ग्रहांची, ताऱ्यांची माहिती घेण्यासाठी आपल्या पुण्यात खोडद येथे प्रचंड मोठ्या अशा ३० अँटिना असून या ठिकाणी जगातील तब्बल ४१ देशातील शास्त्रज्ञ अभ्यास करत असल्याची माहिती यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

तसेच विद्यार्थ्यांनी आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक विषयावर प्रश्न तयार करून विचारणे गरजेचे आहे. तसेच मुलांना प्रश्न विचारण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांचे बरोबरच पालकांची असल्याची त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांवर याच वयात संस्कार झाले पाहिजेत. देशाला जगाला फायदा होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षा असे आवाहन या वेळी डॉ. जे. के. सोळंकी यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कुरकुटे यांनी, सूत्रसंचालन सोमनाथ भंडारे यांनी तर आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यांनी मानले.





