- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषात खराबवाडी चे विद्यार्थ्यांनी काढली बाल वारकरी दिंडी

ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषात खराबवाडी चे विद्यार्थ्यांनी काढली बाल वारकरी दिंडी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
” ज्ञानोबा माऊली तुकाराम ” च्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या निनादात भगवे ध्वज हातात घेत पर्यावरण पूरक फलक हातात घेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी, ता. खेड येथील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी काढली. यावेळी विद्यालयातील तब्बल १६०० विद्यार्थी या पालखी सोहळ्यात सहभागी झाली होती.
अखंड मानव जातीचे दैवत श्री पांडुरंगाच्या भेटीला दरवर्षी वारकरी पंढरपूरला जातात त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडीचे बाल वारकरी दिंडी घेऊन विठू नामाच्या गजर करत गाव फेरीने सकाळ आणि दुपार सत्रातील विद्यार्थी – शिक्षक – ग्रामस्थ – हनुमान प्रसादिक भजनी मंडळ यांच्या सहभागात दिंडी सोहळा संपन्न झाला.


या सोहळ्याचे उत्तम प्रकारे नियोजन शाळा व्यवस्थापन समितीने केली होती दिंडी सोहळ्यात सचिन धाडगे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, तेजस वाडेकर सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, अमोल भाटी मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षक, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. समारोपप्रसंगी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page