- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणसनराइज इंग्लिश स्कूलमध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन

सनराइज इंग्लिश स्कूलमध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
” ज्ञानोबा माऊली तुकाराम ” च्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत या वर्षी देखील कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील सनराइज इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आषाढी यात्रेच्या निमित्ताने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


अगदी लहान गटापासून मोठ्या गटातील तब्बल ७०० विद्यार्थी, शिक्षक व पालक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. या सोहळ्यात शाळेपासून ते श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत व मंदिरापासून ज्ञानराज नगर ते सनराइज् स्कूल असा हा दिंडी सोहळा निघाला.


” पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल ” असे वातावरण निर्माण झाले. त्यात वारकरी, टाळकरी, विणेकरी, खांदेकरी अशा अनेक वेशभूषा परिधान केलेला चिमुकल्यांनी धरलेला ठेका मन आनंदून सोडत होता. त्यातच संत मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत गोरा कुंभार असे विविध पात्र मुलांनी साकारले होते. यामध्ये इयत्ता दुसरी मधील विद्यार्थी अकुल कुंभार याने अभंग सादर केला. तसेच इयत्ता सातवी व चौथी मधील विद्यार्थिनीनी ” गजर माऊलीचा व रखुमाई ” या गाण्यावर नृत्याचा ठेका धरला. तसेच सर्व सहशिक्षिका व विद्यार्थी यांनी फुगडी खेळत या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.


यासाठी पालखी सोहळ्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे -घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शिंदे, मिस्त्री शिल्पा, ताठे शितल, मुरकुटे निर्मला, गावठी स्वप्नाली, पारखे संगीता, रोहिणी शिंदे, तांदळे शितल, उन्हाळे अश्विनी, मायनी आरती, देशपांडे सुवर्णा, सोळसे जयश्री, सेल मोकर, अर्चना ढमढेरे, कल्याणी शिवले, प्रीती, पेंटुले संजय, फडतरे सागर, साठे विशाल, पांडे दीपिका, सुकन्या पारवे आदींनी सक्रिय सहभाग घेतला.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page