गजानन गव्हाणे पाटील
टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वढू बुद्रुक, ता. शिरूर येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयांमध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यांनी दिली.

इयत्ता पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी हे पारंपारिक पोशाख परिधान करून गळ्यामध्ये टाळ आणि मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन अशा प्रकारचा पेहराव केला होता. सकाळी मुलांनी शाळेत येऊन अतिशय आकर्षक पद्धतीने पालखी सजवली. त्या पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यासारखे पवित्र ग्रंथ त्यामध्ये ठेवले.
विद्यालयातील प्रासंगिक विभागाच्या प्रमुख साळुंखे, मोकाशी, काकडे, कोबल, आरगडे, वाघ या शिक्षिकांनी तसेच सूर्यवंशी सर यांनी विद्यालयातील एका विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या पेहराव मध्ये तयार केले होते. यावेळी विद्यालयामध्ये पालखीचे पूजन करण्यात आले.
या पालखीच्या पूजनाच्या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक कुरकुटे, सोमनाथ भंडारे आणि सोनवणे सर आणि इतर शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पालखीचे प्रस्थान शाळेतून होऊन पायी वारीद्वारे गावातील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी या ठिकाणी दर्शन घेऊन गावातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासमोर विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी रिंगण सोहळा आयोजित केला होता.

या रिंगण सोहळ्यामध्ये विद्यालयातील वारकऱ्यांनी अभंग, गवळण सादर करून फुगड्या घालून, नाचून, गाऊन रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. त्यानंतर पालखीचे प्रस्थान पुन्हा विद्यालयामध्ये झाले विद्यालयात आल्यानंतर आरतीने या दिंडी सोहळ्याची सांगता झाली. या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने वढू गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिंडी सोहळ्यासाठी वढू गावातील ह. भ. प. राजाभाऊ भंडारे, हरिभाऊ भंडारे, बाळासाहेब भंडारे चेअरमन, चंद्रकांत आहेर, गोरक्ष धोंडीबा भंडारे, बाळासाहेब पांडे, सचिन गोपाळे आणि इतरही वारकरी संप्रदायातील वढू ग्रामनगरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिंडी सोहळ्यासाठी विद्यालयातील शिक्षक शिंदे सर, शिवले सर, वनवे सर, भामरे सर ,आग्रे सर, येडे सर ,शरद भंडारे सर, शंकर भंडारे सर, गव्हाणे सर, दरेकर तात्या, उकिरडे तात्या, गोसावी तात्या या सर्व शिक्षकांनी उत्साहाने नियोजन करून कार्यक्रमात सहभाग घेतला.





