गजानन गव्हाणे पाटील
कर्मवीर विद्यालय वाडा माजी विद्यार्थी संघातर्फे शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाडा पुनर्वसन येथे गरीब व गरजू मुलांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप काल करण्यात आले. त्यामध्ये पाचशे वाह्या, पेन्सिल, पेन गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर माळी (जाधव), सचिव बाळासाहेब कुलकर्णी त्याचबरोबर संस्थेचे संचालक अरुण वाडेकर, शोभा जाधव, काजळे सर उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटलांनी महाराष्ट्र मध्ये जे शिक्षणाचे जाळे उभे करण्यासाठी तळागाळातील सर्वांना शिक्षण मिळावे त्यापासून वंचित राहू नये यासाठी जे कष्ट घेतले, त्याचीच आठवण म्हणून माजी विद्यार्थी संस्था गेली १० वर्षापासून जुना वाडा व नवीन पुनर्वसन वाडा येथे दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करतात.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विठ्ठल पवार यांनी केले. तसेच बी.डी. कुलकर्णी नितीन ढोरे व मनोहर माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपसरपंच संपत माळी, पोलीस पाटील नितीन ढोरे, सामाजिक कार्यकर्ते शैलेश सावंत सर्व शिक्षक वृंद, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिंदे सरांनी केले तर, सुनील गव्हाणे यांनी आभार व्यक्त केले.





