गजानन गव्हाणे पाटील
युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमृता पठारे त्यांना नुकताच युवा क्रांती फाउंडेशन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शिर्डी येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अमृता पठारे या मागील अनेक वर्षांपासून तळागाळातील वंचित पीडित गोरगरिबांना मदत करणे, महिला व मुलींना सक्षम करण्यासाठी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमासाठी तसेच राष्ट्रीय लोकशाहीची विचारधारा सक्षम करण्यास राष्ट्रीय आपत्ती आल्यास प्रसंगी धावून जाणे यासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित असलेल्या अमृत पठारे यांची युवा क्रांती फाउंडेशन ने कार्याची दखल घेत यांना युवा क्रांती पुरस्कार सन २०२५ च्या निमित्ताने विशेष योगदानाबद्दल तसेच राष्ट्रीय लोकशाही विचारधारा सक्षम करण्याचा अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल उत्तम संघटन कौशल्य,महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ ने युवा क्रांती फाउंडेशन ने सन्मानित केले.

युवा क्रांती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांनी वर्धापन दिनानिमित्त शिर्डी या ठिकाणी भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्यामध्ये बालयोगी स्वामी राजेश्वर नंद सरस्वती, कैलास चौधरी (समाजसेवक), पोलिस निरीक्षक देविदास लाड, पोलिस निरीक्षक गलांडे, तोरणे, ह. भ. प. नाना महाराज कापडणीस, ह. भ. प. मधुकर महाराज आहिरे, ह. भ. प. प्रकाश राणे महाराज, ह. भ. प. राहुल महाराज कडु, ह. भ. प. तुषार महाराज कुलकर्णी, किसान विकास मंचचे सुभाष शेट्ये, शिवाजी शेलार, रणदिवे, अप्पा गायकवाड, आगरकर, विलास रोहिले, जयश्री आहिरे, वसुधा नाईक, अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष भाग्यराम गुजर, जयश्री इंगळे, मीना गवारे, वर्षा नाईक, प्रियंका शेलार, संकेत गवळी अजिंक्य सातपुते आदी मान्यवर तसेच महाराष्ट्रातील पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.





