- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशरदचंद्रजी पवार विद्यालयात राजश्री शाहू महाराज जयंती आणि अमली पदार्थ विरोधी दिन...

शरदचंद्रजी पवार विद्यालयात राजश्री शाहू महाराज जयंती आणि अमली पदार्थ विरोधी दिन संपन्न

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
आजची युवा पिढी व्यसनाधिनतेकडे चालली असल्याची खंत असून या पिढीला वाचविण्यासाठी पालकांनी आणि त्यांचे जवळच्या मित्रांनी त्यांना त्यापासून रोखण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे मत मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यांनी व्यक्त केले.


वढू बुद्रुक, ता. शिरूर येथील शरदचंद्रजी पवार विद्यालयात आयोजित अमली पदार्थ विरोधी दिनाचे निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते. याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने त्यांना पुष्पहार घालत त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी हर्षल गायके, तनवी गुंजाळ, कीर्ती बडे, आदेश गोपाळे, तनिष्क भंडारे, आयुष भंडारे, श्रीराज शिवले, शौर्य कानडे, स्नेहल मुळावकर, आदिती गोपाळे, सिद्धी घोरपडे, कोमल जाधव, माधुरी इंगळे या विद्यार्थ्यांसह पोपट वणवे या शिक्षकांनी राजश्री शाहू महाराज यांचे बद्दल आपली मनोगते व्यक्त केली. तसेच इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरी सोमनाथ पऱ्हाड हिने स्वयंरचित अंमली व्यसन विरोधी दिनानिमित्त कविता सादर केली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी चंचल खैरनार आणि सिद्धी भंडारे यांनी केले. तर आभार सोनवणे यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page