गजानन गव्हाणे पाटील
विद्यार्थ्यांना शाळेत जीवनात बदलणारे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. तसेच उज्वल भविष्य घडविण्यासाठी शिक्षक – पालक – विद्यार्थी यांच्यात समन्वय असणे गरजेचे असल्याचे मत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य व सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील छत्रपती संभाजी महाराज हायस्कूल येथे इयत्ता ९ वी व १० वी च्या पालकांचे चिंतन शिबिरात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शरद अडूरकर होते.

यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका वर्षा वाजे, पालक उमेश गव्हाणे, नितीन काशिद, सोनाली शिनगारे आदी पालक, शिक्षक यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरी यांनी केले.





