◆ पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुस्ती स्पर्धेचे आयोजन ◆
कोरेगाव भीमा : विशेष प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या वाढदिवसानिमित्ताने 7 व 8 मे रोजी लोणीकंद येथे शिरुर – हवेली मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत कीताबाच्या लढतीमध्ये दौंडच्या पै. तुषार डुबे याने इंदापुरच्या पै. बाबासाहेब तरंगेला पराभुत करुन शिरुर – हवेली मल्लसम्राट कीताबाचा मान पटकावला. भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व दौंड चे आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते पै तुषार डुबे यास मानाची गदा व रोख पारितोषिक देण्यात आले.
यावेळी प्रदीपदादा कंद, रोहीदास उंद्रे, धर्मेन्द्र खांडरे, सुभाष जगताप, गणेश ताठे, स्वप्निल उंद्रे, दादासाहेब फराटे, सुदर्शन चौधरी, प्रविणनाना काळभोर, दादासाहेब सातव, अमोल शिवले, गणेश चौधरी, नितिन गावडे, विजय जाचक, संदीप सातव, श्रीकांत कांचन, अनिल सातव, भगवान शेळके, सुधीर फराटे, संजय पाचंगे, मेघराज कटके, पांडुरंग खानेकर, बाबासाहेब चौधरी, रविंद्र कंद व इत्यादी कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी व भाजपा नेते व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते .
या स्पर्धेचे आयोजन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे जिल्हा भाजपा सरचिटणिस धर्मेंद्र खांडरे, शिरुर तालुका भाजपा अध्यक्ष आबासाहेब सोनावणे, पंचायत समिती सदस्य शामराव गावडे, सरपंच सचिन शेलार, पै. बाबासाहेब दरेकर व पै. हनुमंत कंद यांनी केले. स्पर्धेचे संयोजन पै. निळोबा कंद, पै. कीरण शिंदे, पै. सुधीर शिंदे, पै. सोहम शिंदे, पै. स्वप्निल कंद, पै. सागर शिंदे, पै. रतीकांत जगताप यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब झुरुंगे यांनी केले
उर्वरीत गटातील विजेते पुढील प्रमाणे :-
50 कीलो – प्रथम सनी फुलमाळी, द्वितीय अमोल करे, 54 कीलो – प्रथम राहुल हरगुडे, द्वितीय अमित कुलाळ, 57 कीलो – प्रथम धनंजय साबळे, द्वितीय गौरव घाडगे, 61 कीलो – प्रथम रितेश दरेकर, द्वितीय निरंजन शिंदे, 65 कीलो प्रथम सौरभ शिंदे, द्वितीय सचिन दातार, 70 कीलो – प्रथम आबा शेंडगे, द्वितीय प्रथमेश वाघमारे, 74 कीलो – प्रथम करण फुलमाळी, द्वितीय यश शिंदे, 79 कीलो – प्रथम शुभम थोरात, द्वितीय अनिकेत गायकवाड, खुला गट – प्रथम पै. तुषार डुबे ,द्वितीय बाबासाहेब तरंगे
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





