- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणपिण्याकल इंडस्ट्री कडून शरदचंद्रजी पवार विद्यालयास शैक्षणिक साहित्य भेट

पिण्याकल इंडस्ट्री कडून शरदचंद्रजी पवार विद्यालयास शैक्षणिक साहित्य भेट

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
पिण्याकल इंडस्ट्रीच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून वढू बुद्रुक, ता. शिरूर येथील शरदचंद्रजी पवार विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या अंतर्गत उत्तम प्रतीच्या तब्बल १४४ दप्तरांचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण, पिण्याकल इंडस्ट्री सीएसआर चे प्रमुख अनिकेत भिलारे, ग्रुप प्रमुख प्रवीण पुजारी, अनुराग पटेल आदी प्रमुख, शिक्षक आणि इयत्ता दहावीचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.


यावेळी बोलताना मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यांनी पिण्याकल इंडस्ट्री चे वतीने देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याबद्दल आभार मानत. विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, खेळ, साहित्य आदी स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाची माहिती दिली. तसेच यासाठी विद्यालयातील शिक्षक एम. एन. सोनवणे यांचे सह इतर शिक्षकांचे कौतुक केले. तसेच सीएसआर चे प्रमुख अनिकेत भिलारे यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीमध्ये चांगले गुण मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपटराव वणवे यांनी केले तर
आभार मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page