गजानन गव्हाणे पाटील
येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पाबळ – केंदुर जिल्हा परिषद गटात विरोधकांना आव्हान देण्यासाठी हिवरे येथील सामुदायिक विवाह सोहळ्याचे जनक आणि उद्योगपती विकास नाना गायकवाड यांनी कंबर कसली असून यावेळी आपणच या गटातून निवडून जाण्यासाठी सज्ज असायची माहिती विकास नाना गायकवाड यांनी दिली.
हिवरे. ता.शिरुर येथील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विकासनाना गायकवाड हे शिरुर तालुक्यातील एक नावा रुपाला आलेले नाव. त्यांची ओळख म्हणजे त्यांनी चालु केलेली सामुदायिक विवाह सोहळा ही चळवळ दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबाला आधार देण्याचे काम करत आहे. तसेच कोरोना काळात गरजु कुटुंबाला किराणा किटचे वाटप करण्यात आले. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती तेव्हा मोफत पाणी टॅंकर चे वाटप करण्यात आले असे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम स्वखर्चाने करुन विकासनाना यांनी एक आदर्श शिरुर तालुक्यात तयार केला आहे.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विकासनाना यांनी रिंगणात उतरावे अशी सर्व सामान्य जनतेची अपेक्षा आहे. दिवसेंदिवस पाबळ-केंदुर जिल्हा परिषद गटातील जनतेचा आवाज जोर धरत असुन विकासनाना गायकवाड यांना जिल्हा परिषद सदस्य केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा चंगच तरुणांनी व सहकारी मित्र आणी सर्व जनतेने बांधलेला आहे.





