गजानन गव्हाणे पाटील
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने वढू बुद्रुक, ता. शिरूर येथील शरदचंद्रजी पवार विद्यालयात जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य विद्यार्थ्यांनी योगासने केली.

यावेळी विविध आसणे, योगासने, सूर्यनमस्कार अशाच प्रकारचे अनेक योगासने विद्यालयातील क्रीडा शिक्षक रामचंद्र शिवले यांनी विद्यार्थ्यांसमोर करून दाखवत विद्यार्थ्यांकडून करून घेतली.
शिक्षणाबरोबर आपले शरीरिक सुदृढ व आजार मुक्त होण्यासाठी योगासने ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यपिक एकनाथ चव्हाण यांनी बोलताना सांगितले.

या जागतिक योग दिनाचे निमित्ताने संस्थेचे पदाधिकारी साहेबराव भंडारे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक विलास कुरकुटे, सोमनाथ भंडारे, मिठू सोनवणे, हरीश शिंदे, रवींद्र भामरे, पोपट वणवे, मंगल मोकाशी, मनीषा साळुंखे, सुनंदा काकडे, शहाजी येडे, राजेश आग्रे, शरद भंडारे, काळू सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते.





