गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथे जागतिक योग दिनाचे निमित्ताने सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी ५५० विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सामूहिक योगासने केली.

यावेळी ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, पद्मासन, वक्रासन, वज्रासन, सुप्त वज्रासन, उष्ट्रासन, अर्ध उष्ट्रासन, पादहस्तासन, शलभासन, प्राणायाम आदी आसने सामूहिक रित्या करण्यात आली.
वर्षभर विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच खेळ, बौद्धिकता आणि आरोग्य जपण्यासाठी योगासने करणे गरजेचे असल्याचे मत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे=घुटे यांनी सांगितले.

जागतिक योग दिनाचे निमित्ताने विद्यालयातील शिक्षिका भारती शिंदे, शिल्पा मिस्त्री, ताठे शितल, मुरकुटे निर्मला, घावटे स्वप्नाली, पारखे संगीता, रोहिणी शिंदे, तांदळे शितल, उन्हाळे अश्विनी, मायने आरती, देशपांडे सुवर्णा, सोळसे जयश्री, सेलमोकर अर्चना, ढमढेरे कल्याणी, शिवले प्रीती, संजय पेंटुळे, साठे विशाल सर, फडतरे सागर, पाडे दीपिका आदींनी सक्रीय सहभाग घेतला.





