- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणछत्रपती संभाजी हायस्कूलचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजी हायस्कूलचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूलच्या सन २०००-०१ च्या इयत्ता १० वी च्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. २५ वर्षांनी पुन्हा भेट झाल्याचा आनंद आणि जुन्या आठवणींनी भरलेले क्षण, उपस्थित सर्वांच्या मनात आनंदाचे कारंजे उडवत होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीताने आणि दीपप्रज्वलनाने झाली. शिक्षक वर्गातील हरीश्चंद्र आवारे, एन. के. पोळके, वर्षा वाजे, वृषाली काळभोर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक अडुरकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने करण्यात आले.
या संमेलनात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी शेअर करत एकमेकांना आपल्या यशाच्या गोष्टी सांगितल्या. शाळेच्या विकासासाठी काही माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मनमोहक सादरीकरण केले. देशभक्तीपर गीते, नृत्य आणि भाषणांनी वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट भोजन आणि समूह छायाचित्रांच्या सत्राने झाली. सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी दरवर्षी असे संमेलन भरवण्याचा संकल्प केला. कार्यक्रम यशस्वी करण्यात शिक्षकवर्ग आणि माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य अतुलनीय ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा ढेरंगे व पवन कट्यारमल यांनी केले तर आभारप्रदर्शन विवेक ढेरंगे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सरपंच संदीप ढेरंगे, भाऊसाहेब गव्हाणे, राजश्री वाघमारे, मंजुषा भोकरे, स्वप्नील गव्हाणे, महेंद्र खांदवे यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page