गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरुर येथील गेल्या पंधरा वर्षापासुन प्रलंबीत असलेल्या पाणीप्रश्नाबाबत कोट्यावधीचा निधी मंजुर होवुनही जागेअभावी बंद असणारी पाणी योजना अखेर सरपंच संदीप ढेरंगे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिका-यांनी गेले नऊ महिन्यापासुन वनविभागाकडे सतत पाठपुरावा करुन कोट्यावधी रुपयांची जागा पाणी योजनेसाठी मोफत मिळवुन देण्यात यश आल्याने कोरेगाव करांची काळ्या पाण्यापासुन मुक्तता होणार असल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी चौकात फटके वाजवत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कोरेगाव भिमा याठिकाणी असणा-या भिमा-भामा-इंद्रायणी नदीच्या दुषीत पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. दरम्यान सरपंच संदीप ढेरंगे यांनी सदर पाणी प्रकल्पासाठी वनविभागाची शासकीय जागा मिळवुन देण्यासाठी वनविभागाचे जुन्नर वनपरिक्षेत्राचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते व वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे यांच्याकडे पाठपुरावा केला. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगौडा, उप विभागीय अभियंता दत्ता पवार यांच्यासह माजी उप विभागीय अभियंता श्रीकांत राऊत यांचेही मोठे योगदान आहे.

यावेळी सरपंच संदीप ढेरंगे यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य पी. के. गव्हाणे, मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, घोडगंगेचे माजी संचालक कैलासराव सोनवणे, माजी सरपंच अशोक काशीद, विलास खैरमोडे, संगीता कांबळे, सोसायटीचे माजी अध्यक्ष पंडित ढेरंगे, बबुशा ढेरंगे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बबन गव्हाणे, विवेक ढेरंगे, बाळासाहेब वाडेकर, जालिंदर ढेरंगे, अर्जुन गव्हाणे, तानाजी ढेरंगे, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरेगावकरांवर वनविभागाची कृपादृष्ठी
पंधरा वर्षापासुन प्रलंबित असलेल्या कोरेगाव भिमा पाणी योजनेसाठी गेल्या नऊ महिन्यापासून वनविभागाकडे सतत पाठपुरावा केल्याने गावच्या पाणीपुरवठ्यासाठी वनविभागाने तब्बल ४२ गुंठे जागा गावाला उपलब्ध करुन दिल्याने कोरेगावकरांना काही महिन्यात शुध्द पाणी मिळणार आहे. यासाठी वनविभागाचे जुन्नर वनपरिक्षेत्राचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते व वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे, वनपाल गौरी हिंगणे, वनरक्षक बबन दहातोंडे यांनी मोठी मदत केली असल्याचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी सांगितले.





