- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणप्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त घरबसल्या मिळवा रोज एक पैठणी साडी

प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त घरबसल्या मिळवा रोज एक पैठणी साडी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील लोणीकंद येथील पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीपदादा विद्याधर कंद यांच्या ५४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अनोखी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पै. संदीप भोंडवे यांच्या पुढाकाराने आयोजित या स्पर्धेमध्ये घरबसल्या सहभागी होता येणार असून भाग्यशाली विजेत्यांना दररोज एक भव्य पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
८ मेपासून सलग ५४ दिवस दररोज रात्री ८ वाजता स्पर्धकांना त्यांच्या मोबाईलवर एक प्रश्न पाठविण्यात येईल. प्रत्येक प्रश्नासोबत चार पर्याय देण्यात येणार असून योग्य उत्तराचा क्रमांक कमीत कमी वेळेत पाठवणाऱ्या स्पर्धकास दिवसभरातील विजेता घोषित करण्यात येईल व पैठणी साडी प्रदान केली जाईल.


स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपले नाव, गाव व व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ८९५६१४४९९१ या मोबाईल नंबरवर टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभाग फक्त शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मर्यादित आहे.
घरबसल्या पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळवण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,” असे आवाहन क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष पै. संदीप उत्तमराव भोंडवे यांनी केले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page