गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील भैरवनाथ महाराजांची यात्रे निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटी खालची आळीच्या वतीने देण्यात आली.

चैत्र शुद्ध प्रतिपदा सोमवार दि. २८ एप्रिल आणि मंगळवार दि. २९ एप्रिल या दोन दिवसीय यात्रेचे आयोजन कोरेगाव भिमा (खालची आळी) च्या वतीने करण्यात आले आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी ६ वाजता श्री भैरवनाथ महाराजांचा अभिषेक, ८ वाजता गावातील विसर्जन मार्गावरून पालखी मिरवणूक, दुपारी १२ वाजता भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच रात्री ९ वाजता ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी रघुनाथ खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.

तर मंगळवार दि. २९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता कोरेगाव भिमा मध्ये प्रथमच गौतमी पाटील ऑर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर गावात पाळणे, खेळणी आदीची दुकाने थाटण्यात आली आहेत.





