- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणश्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्तांचा आळंदीत ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्तांचा आळंदीत ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार

- Advertisement -spot_img

लोंढे कबीर महाराज, पाटील महाराज, ॲड. रोहिणी पवार यांचा सत्कार
ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट तर्फेही सत्कार
आळंदी देवाची : अर्जुन मेदनकर
येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, आळंदी या विश्वस्त संस्थेच्या विश्वस्त मंडळावर नवीन नियुक्त झालेल्या विश्वस्तांचा सत्कार आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी शिक्षण संस्था, आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचेसह आळंदीकर ग्रामस्थ आणि विविध मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी विविध सेवाभावी संस्था, मंडळे, वारकरी शिक्षण संस्था आदींचे वतीने नूतन पदाधिकारी यांना आळंदीकर ग्रामस्थांचे वतीने सन्मानित करण्यात आले.


या सत्कारात संप्रदायातील कीर्तनकार चैतन्य महाराज कबीर बुवा लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर आणि पुण्यातून ॲड. रोहीणी पवार यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी प्रमुख विश्वस्त व विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, मुख्य व्यवस्थापक माऊली वीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर , उपव्यवस्थापक तुकाराम माने, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, रोहिदास तापकीर, राहुल चिताळकर पाटिल, वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष डी.डी. भोसले पाटील, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, नंदकुमार कुऱ्हाडे, विलास घुंडरे, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, माजी नगरसेवक अशोक कांबळे, रमेश गोगावले,तुषार घुंडरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक डॉ. राम गावडे, संजय घुंडरे, किरण येळवंडे, अजयशेठ तापकीर, साहेबराव कुऱ्हाडे, नगरपरिषदेचे गटनेते पांडुरंग वहीले, वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे, सचिव नाना महाराज चंदिले, नंदकुमार वडगावकर, शंकरराव कुऱ्हाडे, मीराताई भोसले, विलास कुऱ्हाडे, संदीप नाईकरे, पांडुरंग वरखडे, अजित वडगावकर, अनिल वाघमारे, महेश गोरे, श्रीधर कुऱ्हाडे, सुनिल रानवडे, महेश कुऱ्हाडे, ॲड.नाझीम शेख, संकेत वाघमारे, सौरभ गव्हाणे, अरुण घुंडरे, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरु, अभियंता रविंद्र रणदिवे आळंदी ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील सेवाभावी संस्था आदी मान्यवरांनी नवनियुक्त विश्वस्तांचा सत्कार केला.


आळंदीतील कबीर मठाचे प्रमुख चैतन्य महाराज कबीरबुवा लोंढे, अमृतनाथ स्वामी महाराज धमर्शाळेचे प्रमुख महंत पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर, विधीतज्ञ रोहीणी पवार यांच्या झालेल्या निवडीचे परिसरातून स्वागत करण्यात आले. यावेळी विश्वस्त राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे आदींनी मनोगते व्यक्त केली. पसायदानाने नागरी सत्कार समारंभाची सांगता झाली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page