पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी केल्याने निवड
गजानन गव्हाणे पाटील
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने बी.जे.एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली यांना ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे ही सभा पार पडली. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शिक्षण व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी सहायक क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके, अधिसभा सदस्य डॉ. रमेश गायकवाड, समितीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र अवघडे, सचिव डॉ. उमेश पनेरू, बी.जे.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, तळेगाव ढमढेरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे आदी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील ८० महाविद्यालयांमध्ये बी.जे.एस. महाविद्यालयाची कामगिरी विशेष ठरली.
या यशाबद्दल भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अरुण नहार, सदस्य विलास राठोड, सुरेश साळुंके यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा संचालक, क्रीडा समिती सदस्य व सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.





