पुणे प्रतिनिधी : अन्वर खान
कात्रज संतोष नगर येथील ” न्यू साइनकर ज्वेलर्स” च्या नवीन नूतनीकरण केलेल्या दालनाचे उद्घाटन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कैलास साईनकर यांनी त्यांचा सत्कार केला.

मे महिन्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर मराठी सिनेमा येत आहे. या मराठी चित्रपटातील अभिनेत्री अश्विनी मांगडे यावेळी उपस्थित होत्या. या चित्रपटासाठीचे सर्व ऐतिहासिक कलाकुसरीचे दागिने साइन कर ज्वेलर्स ने तयार केले आहेत.

उद्घाटन समारंभाला माजी महापौर प्रशांत जगताप, माजी नगरसेविका कल्पना थोरवे, सुवर्णा सरवदे, डॉ. सुनील जगताप तसेच कात्रज परिसरातील मान्यवर, नागरिक, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वाती साईनकर, राहुल साईनकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. गेल्या ३० वर्षापासून साईनकर ज्वेलर्स कात्रज मध्ये ग्राहकांच्या सेवेत आहे.





