गजानन गव्हाणे पाटील
पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाने राबविलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात हवेली तालुक्यातील वाघोलीचे भारतीय जैन संघटना विद्यालय प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाने जिल्ह्यातून १००० च्या पुढील विद्यार्थी संख्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या अभियानात जिल्ह्यातील १५०० शाळांनी सहभाग नोंदवला. शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघ यांचे मार्फत नेमलेल्या पथकाने विद्यालयातील भौतिक सुविधा, प्रशासन, अध्ययन, अध्यापन प्रक्रिया, गुणवत्ता संवर्धनासाठी केलेले प्रयत्न आशा अनेक घटकांची तपासणी करण्यात आली व त्यामधून विजेत्या शाळा घोषित करण्यात आल्या.
सर्व विजेत्या शाळांचा नुकताच गणेश कला क्रीडा सभागृह पुणे येथे गुणगौरव आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यामध्ये भारतीय जैन संघटना विद्यालयास पुणे शहर विभागातून प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले.

याप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, उपशिक्षणाधिकारी छाया महेंद्रकर, संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, शहर संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे व सचिव किशोर बोरसे यांचे हस्ते विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी, पर्यवेक्षक पांडुरंग पवार, उपप्राचार्य पोपटराव गेठे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हास्तर व तालुकास्तर अशा दोन्ही स्तरावरील प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वीकारले.
विद्यालयातील सांघिक कार्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुणवत्ता संवर्धन अभियानातील विद्यालयाचे यश असून ते टिकवून ठेवण्यासाठी विद्यालय सर्वोतपरीने भविष्यातही अग्रेसर असेल असा विश्वास विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी व्यक्त केला तसेच या अभियानामुळे विद्यार्थी हिताचे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सर्व शाळांना झाली व इतर विद्यालयांमधील नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या विद्यालयामध्येही कसे राबविता येतील याचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.
या यशाबद्दल बीजेएसचे संस्थापक शांतीलाल मुथ्था, प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड, शाळा समितीचे अध्यक्ष अरुण नाहर तसेच प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके यांनी प्राचार्य, उपप्राचार्य,पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून विद्यालयाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अभियानातील सहा विभागाचे प्रमुख म्हणून राजेंद्र जायभाय, पूनम सिंह, वंदना बोडके, विष्णू देवडकर, संदीप लोणकर, रेश्मा शितोळे, स्मिता शिंदे, मारुती बोडके, विकास लोणकर, कीर्ती ढमाले यांनी काम पाहिले.





