गजानन गव्हाणे पाटील
जय जिजाऊ जय शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की च्या जयघोषात हवेली तालुक्यातील तुळापूर येथे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, त्यांना मानाचा मुजरा घालून त्यांच्या कार्याला सलाम करून स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी समाधी स्थळ आणि परिसराची स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने स्वच्छता करण्यात आली.


यामध्ये प्रदेश कार्याध्यक्ष अमृता पठारे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र सरनाईक निंबाळकर तसेच त्यांच्या पत्नी शितल महेंद्र निंबाळकर, तुळापूरचे माजी उपसरपंच संतोष शिवले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिता पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष अमृता पठारे, दक्षता प्रदेशाध्यक्ष शंभुप्रिया, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अलका सोनवणे, पुणे शहर कार्याध्यक्ष दीपाली पाटील यांच्यासह आदींनी या स्वच्छता मोहीम पुरेपूर योगदान दिले





