कोरेगाव भीमा येथे ऊस पाचट व्यवस्थापन व नैसर्गिक शेती कार्यशाळा उत्साहात संपन्न
गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा. ता.शिरूर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, ग्रामपंचायत कोरेगाव भीमा आणि विविध कार्यकारी विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पाचट व्यवस्थापन व नैसर्गिक शेतीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी शेतकऱ्यांना शेती विषयक विविध विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला चेअरमन अशोक गव्हाणे, व्हा. चेअरमन रामदास कांबळे, सरपंच संदीप ढेरंगे, उपसरपंच सविता घावटे, माजी पंचायत समिती सदस्य पी के अण्णा गव्हाणे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, कैलास सोनवणे, नारायण फडतरे, मा. सरपंच विजय गव्हाणे, अशोक काशीद, संजय काशीद, मा. चेअरमन पंडित ढेरंगे, अशोक गव्हाणे, देविदास गव्हाणे, पोलीस पाटील मालन गव्हाणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते विकास चव्हाण यांनी ऊस पाचट व्यवस्थापनाच्या प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितल्या. त्यांनी पाचट कुट्टीपासून पाचट पूर्णपणे कुजवण्या पर्यंतच्या पद्धती त्यांच्या प्रत्यक्ष शेतातील अनुभवावर आधारित सादर केल्या. “उसाचे पाचट हे सोन्यासारखे असून त्याचा योग्य वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढवता येते,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रीमती सुवर्णा आदक यांनी Agristak व इतर योजनांची माहिती दिली, तर धनश्री चासकर यांनी नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ग्रामपंचायती मार्फत जीवाणू औषधांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन कृषी अधिकारी प्रशांत दोरगे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर कंद यांनी केले तर सरपंच संदीप ढेरंगे यांनी मान्यवर व शेतकऱ्यांचे आभार मानले.
यापुढेही शेतकरी बांधवासाठी वेगवेगळ्या योजना राबवू व अश्या चांगल्या कार्यक्रमाचे नियोजन करू तसेच चांगल्या ठिकाणी शेतकरी सहल काढणार आहे – सरपंच संदीप ढेरंगे





