गजानन गव्हाणे पाटील
गावातील युवा पिढी विविध स्तरावर यशाचा झेंडा रोवत असल्याने याचा सर्वांना अभिमान असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच सुसज्ज ग्रंथालय आणि आवश्यक पुस्तके उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन आदर्श सरपंच संदीप ढेरंगे यांनी केले.


कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील गजानन महाराज मंदिरात अखिल ज्ञानराज नगर यांच्या वतीने नुकत्याच मुंबई पोलीस भरती मध्ये भरती झालेल्या पूजा लक्ष्मण दहिवाडे तसेच आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल कोरेगाव भिमा च्या पोलीस पाटील मालन रामदास गव्हाणे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सरपंच संदीप ढेरंगे, अनिल खंदारे, रियाज पठाण, संजय गव्हाणे, प्रफुल्ल फुरसुंगे, आनंद जाचकर, ॲड. साजिद शेख, जयदेव ठाकरे, सचिन दत्तोबा माने, सचिन माधुरे, सुमित साळुंखे, मधुकर पवार, राजेंद्र सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, आबा पाटील, मनोज चौधरी, आकाश भोयर, विजय चव्हाण, भगवान बिडसकर, रवींद्र बिडसकर, संदीप दळवी, किशोर पाशे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन रियाज पठाण यांनी केले.





