- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भीमामध्ये ऊस पिक पाचट व्यवस्थापन व नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन

कोरेगाव भीमामध्ये ऊस पिक पाचट व्यवस्थापन व नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग, ग्रामपंचायत कोरेगाव भिमा व कोरेगाव भिमा नं. २ वि.का.सेवा सह.संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पिक पाचट व्यवस्थापन व नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन उद्या दि. सोमवार दि. १०/०२/२०२४ रोजी सकाळीं १० वा. ग्रामपंचायत कार्यालय कोरेगांव भिमा येथे आयोजित करण्यात आलेली आहे अशी माहिती सरपंच संदीप ढेरंगे आणि विकास सोसायटी चे चेअरमन अशोक गव्हाणे यांनी दिली.


या कार्यशाळेच्या अंतर्गत वसंतराव नाईक कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते तसेच ऊस नियोजन समिती महाराष्ट्र राज्य सदस्य विकास चव्हाण उपस्थित शेतकरी.वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत. तर सहाय्यक निबंधक, सह. संस्था, शिरूर चे अरूण साकोरे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदर पिक कार्यशाळेत शेतकऱ्यांसाठी खालील सुविधा ग्रामपंचायत मार्फत मोफत दिल्या जाणार आहेत. यामध्ये शेतकरी ओळखपत्र, मोफत औषधे वाटप. तसेच शेती कर्जा बाबत बँक अधिकारी यांचे मार्गदर्शन होणार आहे.


तसेच गावातील प्रगतशील व उच्चांकी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कार्यशाळेस उपस्थित राहून वरील सुविधा व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी ग्रामपंचायत सदस्य आणि विद्यमान चेअरमन अशोक गव्हाणे आणि सरपंच संदीप ढेरंगे यांनी केले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page