- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणस्पर्धा परीक्षा व अवांतर पुस्तके वाचनालयात उपलब्ध करून देण्यासाठी पुस्तकांची यादी पाठविण्याचे...

स्पर्धा परीक्षा व अवांतर पुस्तके वाचनालयात उपलब्ध करून देण्यासाठी पुस्तकांची यादी पाठविण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन : ढेरंगे

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
ग्रामीण भागातील युवा वर्गाला स्पर्धा परीक्षेसाठी अनेकदा पुस्तकांची आवश्यकता असताना देखील ती उपलब्ध होत नाहीत याच साठी ग्रंथालयात स्पर्धा विभाग सुरू करून मुलांना आवश्यक ती पुस्तके ग्रामपंचायत चे माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याचे कोरेगाव भिमाचे आदर्श सरपंच संदीप ढेरंगे यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.


कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील जयहिंद मोफत वाचनालयात पुस्तक खरेदी प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ग्रामपंचायत चे माध्यमातून विद्यार्थी – पालक यांना अवांतर, स्पर्धा परीक्षा तसेच इतर वाचनीय पुस्तकांची यादी येत्या १० फेब्रुवारी पर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात देण्याचे आवाहन ग्रामपंचायत चे माध्यमातून करण्यात आले आहे.


सध्या गावात जयहिंद मोफत वाचनालय आणि फ्रेंड्स वाचनालय अशी दोन वाचनालये आहेत. यामध्ये तब्बल पंधरा हजारांचे आसपास पुस्तके आहेत. परंतु स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना अनेकदा अपेक्षित पुस्तके उपलब्ध होत नाहीत. यामुळे त्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. हीच अडचण लक्षात घेत ग्रामपंचायत ने पुढाकार घेत पुस्तके खरेदी करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.


तसेच विद्यार्थ्यांनी त्यांना आवश्यक पुस्तकांची यादी लवकरात लवकर ग्रामपंचायत कार्यालयात देण्याचे आवाहन सरपंच संदीप ढेरंगे यांनी केले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page