- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआदर्श प्रतिष्ठान च्या महागणपती चा जन्मोत्सव उत्साहात साजरा

आदर्श प्रतिष्ठान च्या महागणपती चा जन्मोत्सव उत्साहात साजरा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या कोरेगाव भिमा येथील आदर्श चौकातील आदर्श प्रतिष्ठान च्या वतीने गणेश जन्म सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी गणपती मंदिराला तब्बल ५५ किलो फुले वापरून आकर्षक सजावट करण्यात आली. यासाठी संकेत गव्हाणे, गणेश भवाळकर यांच्या सह आदींनी मदत केली. तर पहाटेचा अभिषेक उद्योजक तानाजी गव्हाणे आणि वर्षा गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आली. याचे पौरोहित्य श्रीनिवास कर्डेकर यांनी केले.


तर सायंकाळी श्रींची महाआरती माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, उद्योजक रविराज गव्हाणे, महाराष्ट्र पोलिस प्रवीण गव्हाणे, संकेत गव्हाणे यांचे हस्ते पार पडली. यावेळी शेकडो गणेश भक्त सहभागी झाले होते. यामध्ये युवा वर्ग आणि महिला गणेश भक्तांची संख्या मोठी होती.
तर यावेळी सर्व गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याचा देखील शेकडो गणेश भक्तांनी लाभ घेतला. यासाठी माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, कांद्याचे व्यापारी विजय गव्हाणे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन सुनील गव्हाणे, माजी सरपंच विक्रम गव्हाणे, उद्योजक तानाजी गव्हाणे, प्रवीण गव्हाणे यांचे माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तर पिण्याची पाण्याची व्यवस्था युवा उद्योजक अक्षय गव्हाणे यांच्या वतीने करण्यात आले होते.


लाईट डेकोरेशन किशोर गव्हाणे सुमित कुदळे तर वर्षभर संकष्टी चतुर्थी आणि गणेश जन्म सोहळ्यासाठी हार आणि पेढे यांची व्यवस्था सचिन यनभर आणि यश यनभर यांनी केले.
संपूर्ण गणेश जन्म सोहळ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन शुभम गव्हाणे, अभिषेक वाडेकर, शिवम तापकीर, निखिल मित्तल, सोमनाथ मांजरे, अतुल मित्तल, राज पठाण आदींनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page