- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणवाघोलीत वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरणारी वाहने, अतिक्रमणांवर होणार सर्जिकल स्ट्राईक

वाघोलीत वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरणारी वाहने, अतिक्रमणांवर होणार सर्जिकल स्ट्राईक

- Advertisement -spot_img

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा कडक इशारा ; आयुक्तांनी आमदार, अधिकारी, ग्रामस्थांसह वाघोलीत केली पाहणी
गजानन गव्हाणे पाटील
वाघोलीत होणारी वाहतूक कोंडी गंभीर असून या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी वाहने, नो एन्ट्री, ट्रिपल सीट, अवैध वाहतुकीवर तसेच रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा करणारी अतिक्रमणे संबंधित यंत्रणेच्या मदतीने सर्जिकल स्ट्राईक करून काढून टाकणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले असून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचा कडक इशारा त्यांनी दिला. वाहतूक कोंडीवर काय उपाययोजना केल्या गेल्या याचा १० फेब्रुवारी रोजी पुन्हा आढावा आयुक्त कुमार घेणार आहेत.
शिरूर-हवेली मतदारसंघातील शहरालगत येणाऱ्या गावांच्या ट्रॅफिक समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंगळवारी (दि. २८) वाघोली येथे संपन्न झाली. बैठकीपूर्वी आयुक्त कुमार यांनी आमदार ज्ञानेश्वर कटके, विविध विभागाचे अधिकारी, ग्रामस्थांसह वाघोलीत प्रत्यक्ष उतरून वाहतूक कोंडीबाबत माहिती घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. बैठकीला अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, परिमंडळ ४ चे उपायुक्त हिम्मत जाधव, पीएमपीएमएलच्या दीपा मुधोळ-मुंडे, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ, महावितरण व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी यावेळी वाहतुकीला भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडल्या.
संयुक्त बैठक आणि पाहणी दरम्यान विविध समस्या आणि त्या समस्यांचे निवारण कशाप्रकारे करता येईल यावर चर्चा झाली. दरम्यान चुकीच्या पद्धतीने थांबणाऱ्या ट्रॅव्हल्स, रिक्षा तसेच जड वाहने, रोडला असणारी अनधिकृत बांधकामे, रोडवर अडथळा निर्माण करणारे लाईटचे पोल, उडणारी धूळ, रस्त्याच्या उलट्या दिशेने होणारी वाहतूक, ट्रिपल सीट्स, मद्यपान करून ड्रायव्हिंग तसेच इतरही अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त कुमार यांनी संबंधितांना दिल्या.


वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक कामांकरिता महापालिकेच्या बजेटमध्ये विशेष तरतूद करून सर्व कामे पूर्ण केली जातील. त्यासोबतच राज्य शासनाचा निधी कमी पडू देणार नाही. वाहतुकीला अडथळा ठरणारे कामे करण्याबाबत यापुढे संबंधित विभागांनी चालढकलपणा करू नये रस्ता दुरुस्ती व इतर कामांची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशा स्पष्ट सूचना आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी बैठकीमध्ये दिल्या.
ट्रॅव्हल्स बसेस नगररोडवर थांबायला नकोत
नगर, मराठवाडा विदर्भात जाणाऱ्या बसेस प्रवाशांना घेण्यासाठी वाघोलीतील मुख्य चौकांमध्ये थांबत असल्याने वाहतुकीला अडथळा होऊन कोंडीमध्ये भर पडत असल्याची बाब प्रकर्षाने समोर येत असल्याने आयुक्त अमितेश कुमार यांनी आरटीओ व वाहतुक विभागाला सक्त सूचना देऊन एकही ट्रॅव्हल्सची बस पुणे-नगर रोडवर थांबणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सांगितले. बकोरी फाट्यालगत तयार करण्यात आलेल्या जागेमध्ये बसेस लागतील याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


जबाबदारीच्या ढकला ढकलीने कामे रखडली
पुणे-नगर महामार्गावर वाघोलीत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्गावरील रस्त्याची व इतर कामे करून घेण्याकरिता पोलीस विभाग आग्रही भुमिका घेऊन पाठपुरावा करीत असताना पुणे महापालिका, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग सोयीस्करपणे एकमेकांवर ढकला ढकली करीत असल्याची बाब बैठकीमध्ये पुन्हा एकदा समोर आली. सर्व विभागांनी या कामासाठी एकत्रित काम करावे असे उपस्थितांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page