- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणराष्ट्रीय सेवा योजना आदर्श विद्यार्थी घडवणारी एक युवा चळवळ : पठारे

राष्ट्रीय सेवा योजना आदर्श विद्यार्थी घडवणारी एक युवा चळवळ : पठारे

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेवा योजना आदर्श विद्यार्थी घडवणारी एक युवा चळवळ आहे असे प्रतिपादन विकास प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब पठारे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कै. तुकाराम धोंडीबा पठारे वरिष्ठ महाविद्यालय चंदननगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर डोंगरगाव, ता. हवेली येथे आयोजित करण्यात आले. यावेळी उद्घाटन प्रसंगी पठारे बोलत होते.


या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन विकास प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब पठारे आणि डोंगरगावच्या सरपंच रजनी कांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
पठारे पुढे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विशेषता शिक्षण क्षेत्रातून सेवा संस्कार तरुणांवर घडत असतात तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी युवा शक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा त्यांच्या हातून विधायक कार्य घडावे हा उद्देश या उपक्रमाचा आहे. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदाळे सी.बी यांनी केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सेवेचे महत्त्व व इतिहास सांगितला.


कार्यक्रम अधिकारी प्रा. सारिका साळवे यांनी सात दिवसाच्या उपक्रमाचे नियोजन जसे की डिजिटल साक्षरता अभियान, ग्रामस्वच्छता, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण जनजागृती विषयक उपक्रम याबद्दल माहिती दिली.
यावेळी डोंगरगावचे पोलीस पाटील राहुल गडदे, काळूराम कांबळे, विद्यार्थी प्रतिनिधी सायली गुंजाळ, अविनाश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी सारिका साळवे यांनी केले तर आभार प्रा. अश्विनी गायकवाड मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page