
कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
वाडा पुनर्वसन, ता. शिरूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतचे ध्वजारोहण गावचे विद्यमान सरपंच नवनाथ रंगनाथ माळी यांच्या हस्ते करण्यात आले. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्या व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या वैष्णवी राजेश हत्ते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच सुरेखा ढोरे, ग्रामपंचायत सदस्य स्वाती माळी, वसंत भोकटे, ग्रामसेविका विमल आव्हाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील मिडगुले, आरोग्य सेविका सोनाली राऊत, बाळासाहेब सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी संजय भोकरे आदी मान्यवर, गावचे आजी-माजी पदाधिकारी, विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी सरपंच नवनाथ माळी यांनी ग्रामस्थांना महाराष्ट्र दिनाच्या तर कामगार वर्गाला कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आकर्षक रांगोळी काढून ध्वजाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.







