गजानन गव्हाणे पाटील
उरुळी कांचन येथे अखिल भारतीय राज्य मराठी परिषद व पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य स्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आळंदी म्हातोबा येथील शिक्षक प्रा. सचिन माथेफोड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. ऊसतोड कामगार यांच्या मुलांसाठी तसेच पालावरील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी माथेफोड काम करत असतात. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

यावेळी राज्य भरातून कवी व साहित्यिक एकत्र आले होते. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, प्रा. सुरेश वाळेकर, संमेलन अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे, साहित्य परिषद राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, क्रीडा अधिकारी माणिक देवकर, मा. जि. प सदस्य महादेव कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.





