अनुराग गायकवाड प्रथम तर सार्थक गव्हाणे द्वितीय
गजानन गव्हाणे पाटील
गड – किल्ले या फक्त वास्तू नसून तो आपला जिवंत इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या वास्तूंचे जतन करणे आपले कर्तव्य असल्याचे मत आदर्श सरपंच संदीप ढेरंगे यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथे संदीपदादा फाऊंडेशन आयोजित किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्या आणि स्पर्धेच्या आयोजिका अंजली ढेरंगे, पोपट गव्हाणे, दीपक ढेरंगे, संतोष शिंगाडे, ओंकार घावटे, मेघा घावटे, अमृता दुगड यांच्यासह या किल्ले स्पर्धेचे परीक्षक नारायण गव्हाणे, गोरक्ष घावटे, म्हस्कु शिवले आणि स्पर्धक उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप ढेरंगे पुढे म्हणाले की, मुलांनी बनविलेले विविध किल्ले खूपच तंतोतंत होते. या स्पर्धांमधून मुलांना किल्यांची माहिती उपलब्ध होते. तसेच भविष्यात एखाद्या मोकळ्या जागेत मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी किल्ला बनविण्याचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.

तर या स्पर्धेत लहान व मोठ्या गटात एकूण 27 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये काही मुलींनी देखील सहभाग नोंदविला असल्याचे या स्पर्धेच्या आयोजीका अंजली ढेरंगे यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.
किल्ले स्पर्धा २०२४ चे विजेते पुढील प्रमाणे मोठा गट :- प्रथम क्रमांक – अनुराग गायकवाड (किल्ले राजगड), द्वितीय क्रमांक – सार्थक गजानन गव्हाणे (किल्ले पन्हाळा), तृतीय क्रमांक – स्वराज अमोल काकडे (किल्ले पुरंदर)
तर लहान गटातील विजेते पुढील प्रमाणे :- प्रथम क्रमांक :- प्रणव घावटे (किल्ले जंजिरा), द्वितीय क्रमांक – अद्वैत घावटे (किल्ले जंजिरा) तर तृतीय क्रमांक – हर्षराज ढेरंगे (किल्ले मल्हार गड) या स्पर्धकांना चषक देऊन तर सहभागी स्पर्धकांना देखील चषक देऊन संदीपदादा ढेरंगे फाऊंडेशन च्या वतीने गौरविण्यात आले.
प्रास्ताविक म्हस्कु शिवले यांनी सूत्रसंचालन अंजली ढेरंगे यांनी तर आभार गोरक्ष घावटे यांनी मानले





