- Advertisement -spot_img
Homeशालेयभूमकर महाविद्यालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रम साजरा

भूमकर महाविद्यालयात ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” उपक्रम साजरा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील

श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” या उपक्रमांतर्गत पुस्तक प्रदर्शन व सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले.

यावेळी रामचंद्र शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव शंकर भूमकर, संस्थेचे खजिनदार उद्धव भूमकर, प्राचार्य डॉ. अविनाश देसाई तसेच सिद्धांत भूमकर उपस्थित होते.

भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन, सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी ग्रंथालयामध्ये ग्रंथ प्रदर्शन आणि पुस्तकांचे सामुहिक वाचन घेण्यात आले. सर्वानी पुस्तक वाचनाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव शंकर भूमकर यांनी विध्यार्थाना वाचनाचे महत्व पटवून दिले. संस्थेचे खजिनदार उद्धव भूमकर यांनी ग्रंथालयाचे महत्व सांगितले तसेच प्राचार्य डॉ. अविनाश देसाई यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयावर विध्यार्थाना मार्गदर्शन केले तसेच सध्या मोबाइल च्या अति वापरामुळे तरुण पिढी वाचन संस्कृती पासून दुरावत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे तरुण पिढी ला वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ” वाचन संकल्प महाराष्ट्र ” हा उपक्रम हाती घेतला.

कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सिद्धांत शंकर भूमकर, प्रा. विकास गायकवाड, डॉ सागर शिंदे , डॉ सुषमा तायडे , डॉ वैशाली तुराई ,प्रा दीपाली होडाडे , प्रा. पुरोहित, अनिल जमदाडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन सोहम पांचाळ व अर्चना गोरवे यांनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page