गजानन गव्हाणे पाटील
लोणीकंद, ता. हवेली येथील श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मध्ये स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने राष्ट्रीय युवक दिन व राजमाता जिजाऊ जयंती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी श्री रामचंद्र शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव शंकर रामचंद्र भूमकर, संस्थेचे खजिनदार उद्धव रामचंद्र भूमकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना युवकांनी सक्षम असायला हवे व राजमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन महिलांनी पुढील युवक घडवण्याचे काम केले पाहिजे तसेच प्राचार्य डॉ अविनाश देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि देशाचे भविष्य हे युवा पिढीच्या हाती आहे.

त्यावेळी सिद्धांत शंकर भूमकर, प्रा. विकास गायकवाड, डॉ. सागर शिंदे , डॉ. सुषमा तायडे, डॉ. वैशाली तुराई, प्रा. दीपाली होडाडे, अनिल जमदाडे उपस्तिथ होते.

कार्यक्रमाचे आयोजन प्रा. गणेश केंद्रे व प्रा तेजस्वी हुडे यांनी केले.





