पंढरपूर येथे स्वाभिमानी मराठा महासंघाचा प्रथम राष्ट्रीय अधिवेशनात एल्गार
गजानन गव्हाणे पाटील
मराठा समाजाला आज पर्यंत सरकार कडून सावत्र वागणूक मिळत असून समाजाला अनेक अडचणी असताना सुध्धा सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळावा तसेच यापुढे मराठा समाजावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही असे उद्गागार स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले पाटील यांनी काढले.
पंढरपूर, ता. सोलापूर येथे स्वाभिमानी मराठा महासंघाचा पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात टकले पाटील बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय एम के बी एन आर सागर होते.

यावेळी बोलताना टकले पाटील पुढे म्हणाले की, आज अनेक ठिकाणी गुणवत्ता असून ही मराठा समाजाला आरक्षण नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, मराठा आरक्षणासाठी तरुण आत्महत्या करत आहेत, काही मराठा समाजातील तरुणांच्या हत्या होत आहेत, शेती पिकवणारा मराठा आज गरिबीचे जीवन जगत आहे. याचे कारण म्हणजे शेतीमालाला हमीभाव नाही, देशा मधील मराठा, कुर्मी, पटेल, पाटीदार हा समाज शेती करूनही हमी भाव नसल्यामुळे दुर्बळ झाला आहे.

गौरव अध्यक्ष मराठा रामनारायण कोकिळा पवार राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख ओमकार राजे निंबाळकर, राज्य निरक्षक भानुदास वाबळे पाटील, युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष लखन गाडगे पाटील, दक्षता आघाडी प्रदेशाध्यक्ष शिवशंभो प्रिया जांभळे, महाराष्ट्र महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष अनिता पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष अलका सोनवणे, उपाध्यक्षा सीता जाधव, प्रदेश उपाध्यक्ष माया देशमुख, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष चंद्रकला खेडेकर, राष्ट्रीय युवा अध्यक्ष ज्योती सातव, आंध्रा प्रदेशाध्यक्ष श्रीनिवास पवार, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधा गमे, सुदाम थोरे, वैशाली भयरट, अश्विनी सावंत, मीरा शिंदे, सीता जाधव, पूर्वांचल क्षेत्राध्यक्ष रमेशचंद्र सिंग, राष्ट्रीय संपर्कप्रमुख चंद्रकांत वाघ, न्याय व विधी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. ट्रिपल सिंग, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दीपक पवार, काकासाहेब खूपसे, अनिल बागल, लहू सातपुते, संकेत यशवंतराव, टिकून प्रधान (ओडिशा) निरंजन प्रधान, देवगिरी महाराज, लीलामनी पटेल, सुधाकर इंदलकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष महिंद्र निंबाळकर, पंढरपूर तालुकाध्यक्ष दत्तात्रय देते, सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी वीरभद्र सिंग, सुजेन पटेल, सतीश जाधव, अनंत पोळ ,अनिरुद्ध साबळे ,सुनील शिरफुले ,रुपेश दळवी, अविनाश गायकवाड, अभिजीत खैरे, वैभव खैरे, रामभाऊ मोगल, अशोक गवारे, अमोल भोसले, चंद्रकांत कराळे, अण्णा खांडे तसेच अलका सोनवणे यांनी मधुर अभंगवाणीतून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

प्रस्ताविक राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील यांनी केले तर महिलांचे प्रस्ताविक प्रदेश कार्याध्यक्ष अमृता पठारे यांनी केले.





